लूटमार करणारे ताब्यात

By Admin | Updated: April 23, 2017 02:02 IST2017-04-23T02:02:15+5:302017-04-23T02:02:29+5:30

घोटी : प्रवाशांची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने राहुरीतून (जि. नगर) ताब्यात घेतले

The robber is in possession | लूटमार करणारे ताब्यात

लूटमार करणारे ताब्यात

घोटी : महामार्गावर विविध वाहने आणि प्रवाशांची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने राहुरीतून (जि. नगर) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, मोबाइल संच असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राकेश संसारे, रजनीकांत गरुड अशी या संशयितांची नावे आहेत.
रविवारी (दि. ९) नाशिकच्या दिशेला येणाऱ्या कारमध्ये (क्र. एमएच ४१ व्ही ७६१६) चार अनोळखी प्रवाशी भिवंडी येथून बसले. गाडी घोटी येथील सिन्नर फाट्याजवळ आल्यावर त्यांनी चालकास पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या कडून रोख रक्कम, मोबाइल संच बळजबरीने काढून घेत त्यास गाडीतून बाहेर काढले व वाहन घेऊन पसार झाले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी याकामी तपास पथक स्थापन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी राहुरीजवळ वेहेळगाव भागात सापळा रचून राकेश संसारे, रजनीकांत गरु ड यांना अटक केली. पाठलाग करून ताब्यात घेतले.

Web Title: The robber is in possession