भऊर येथे गंजीला आग
By Admin | Updated: March 5, 2017 00:14 IST2017-03-05T00:14:23+5:302017-03-05T00:14:34+5:30
भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथे शॉर्टसर्किटमुळे मकई चाऱ्याच्या गंजीला आग लागून यात चारा भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

भऊर येथे गंजीला आग
भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथे शॉर्टसर्किटमुळे मकई चाऱ्याच्या गंजीला आग लागून यात चारा भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
येथील शेतकरी अमरदीप रामदास पवार यांनी त्यांच्या गट क्रमांक १९६ मधील शेतात सात ते आठ ट्रेलर एवढा गंजी करून चारा साठवून ठेवला होता. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन खाली ठेवलेल्या चाऱ्याच्या गंजीवर ठिणगी पडली. बघता बघता संपूर्ण चारा भस्मसात झाला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने जवळच असलेला उन्हाळ कांदा यात होरपळून खराब झाला आहे.
चाऱ्याच्या गंजीने पेट घेतल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु चारा वाळलेला असल्यामुळे संपूर्ण चारा भस्मसात झाला. (वार्ताहर)