शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रस्त्यांलगत अथवा वाहनतळात वाहने उभी करताहेत; जरा सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 2:46 PM

रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील; मात्र या वाहनतळांमधील वाहनेही सुरक्षित राहत नसून चोरटे या ठिाकणीही उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा सर्रासपणे फोडून भाविकांचे मौल्यवान वस्तू, दागिणे, रोकड लूटून पोबारा करत असल्याचे समोर आले

ठळक मुद्देवाहनतळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणणे गरजेचे

नाशिक : शहर व परिसरात मोटारींच्या काचा फोडून मोटारींमधील मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा लंपास करणारी टोळी अद्याप सक्रीय असून या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२६) गोदाकाठावर भाविकांच्या मोटारीची वाहनतळात काच फोडून चोरट्यांनी दीड ते दोन लाखांचा ऐवज लूटला. आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या मोटारीची काच त्याचदिवशी फोडून चोरट्यांनी वाहनातून टॅब लांबविला. शहर पोलीस प्रशासनापुढे घरफोड्या, मोटारफोडी, वाहनचोरी, मोबाइल, सोनासाखळी लूटीच्या घटना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील; मात्र या वाहनतळांमधील वाहनेही सुरक्षित राहत नसून चोरटे या ठिाकणीही उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा सर्रासपणे फोडून भाविकांचे मौल्यवान वस्तू, दागिणे, रोकड लूटून पोबारा करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित ठेकेदाराने वाहनतळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणणे गरजेचे आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे भाविकांची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. याकडे महापालिका व पोलस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.हरियाणातील गुडगाव येथून हेमंत ठाकूर हे कुटुंबीयांसमवेत पंचवटीमध्येदेवदर्शनासाठी आले होते. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी (एम एच०६ बी.एफ ८५६५) रामकुंड येथील मनपा वाहनतळावर उभी केली.परिसरात ते देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून डेल कंपनीचा तीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर ठाकूर यांनी संबंधित वाहनतळ चालविणा-या व्यक्तींना धारेवर धरत जाब विचारला. वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी यावेळी त्याने झटकली. दुस-या घटनेत विशाल बाळासाहेब ढिकले (29, रा. धनराज नगर, जुना सायखेडा रोड) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. विशाल यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने बुधवारी दुपारच्या सुमारास मोटारीची (एम.एच१५ जीएल५६९९) काच फोडून १५ हजार रुपयांचा टॅब आणि इतर महत्वाची कागदपत्रे लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी