शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पावसामुळे रस्त्यांची ‘चाळण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:36 IST

शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम तर होतोच परंतु लहान- मोठया अपघातानाही निमंत्रण मिळत आहे.

ठळक मुद्देअपघातांना निमंत्रण : खड्ड्यांमुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम

नाशिक : शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम तर होतोच परंतु लहान- मोठया अपघातानाही निमंत्रण मिळत आहे.पावसाने सलग पाच ते सहा दिवस आपली हजेरी कायम ठेवली, त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, डांबर निघून खडी वर आली, त्यातूनच खड्डे पडायला सुरुवात झाली, पूर्वी पासूनच खराब असलेल्या रस्त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली, शहरातील कॉलेज रोड, गंगापुर रोड मुंबई नाका शरणपूर रोड, शालिमार चौक, जुने नाशिक या भागात खड्डे पडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले आहे, खड्डे चुकविण्याच्या नादात वाहांचालकांकडून अपघात होऊ लागले आहेत.अशीच परिस्थिती उपनगरात देखील असून, नाशिकरोड परिसरातील काही हमरस्ते व कॉलनी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच अनेक रस्त्यावरील डांबर काही प्रमाणात वाहून गेल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे दत्तमंदिर सिग्नल मोटवानी रोड, बिटको चौक, जय भवानीरोड, गायखे कॉलनी जलतरण तलावरोड, सिन्नरफाटा ते दारणानदी पूल, सामनगावरोड, विहितगाव वडनेररोड या प्रमुख हमरस्त्यासोबत कॉलनी भागातील, मळे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे.मॉडेल रोडचीही धूळधाणनाशिक शहरातील काही महत्त्वाचे रस्ते महापालिकेने मॉडेल रोड म्हणून विकसित केले होते, या रस्त्यांची देखील पावसामुळे वाट लागली आहे. गंगापुर, कॉलेज रोड, तिडके कॉलनी, शरणपूर रोड, त्रिंबक रोड वर जागोजागी खड्डे पडले आहेत. महामार्गाला समांतर रस्तेही पावसामुळे खराब झाले असून, प्रकाश पेट्रोल पंप समोरील उड्डाणपुलाखाली तर खड्ड्यांमुळे गुडघाभर पाणी साचू लागले आहे.सातपूरकरांचे निवेदनपावसामुळे सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची खुपच दुरावस्था झाली आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये येणाऱ्या कामगारांना आणि उद्योजकांना गैरसोय निर्माण झाली आहे.उखडलेल्या रस्त्यांमुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे अडथळा होत असल्याने महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी निमाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात निमाचे अध्यक्ष शशीकांत जाधव,सरचिटणीस तुषार चव्हाण, कैलास अहिरे,संजय महाजन, उत्तम दोंदे यांच्या शिष्टमंडळाने मनपाचे शहर अभियंता संजय घुगे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाची दखल घेऊन रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतले जातील. असे आश्वासन घुगे यांनी निमा शिष्टमंडळाला दिलेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा