मालेगावी अनलॉकमुळे गर्दीत हरवले रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 22:19 IST2021-08-05T22:18:57+5:302021-08-05T22:19:49+5:30

मालेगाव कॅम्प : शासनाने कोरोनाबाबतीत नवीन नियमावली सुरू केली आहे, त्यामुळे मालेगाव शहरात व्यापार उद्योग तेजीत आले व शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत असून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हे रस्ते गर्दीत हरवले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Roads lost in crowds due to unlock in Malegaon | मालेगावी अनलॉकमुळे गर्दीत हरवले रस्ते

मालेगावी कॅम्प रस्त्यावर विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची झालेली गर्दी.

ठळक मुद्देकोरोनाचे सर्व नियम गुंडाळत शहरात नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.

मालेगाव कॅम्प : शासनाने कोरोनाबाबतीत नवीन नियमावली सुरू केली आहे, त्यामुळे मालेगाव शहरात व्यापार उद्योग तेजीत आले व शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत असून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हे रस्ते गर्दीत हरवले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मालेगावी यापूर्वीदेखील कोरोनाच्या नियमावलींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या. शासनाकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार नियम जाहीर केले जात आहेत. मालेगावी सध्या कोरोनाबाधितांचा शून्य व एकेरी आकडा मिळत आहे. बाधितांत्या संख्येवर नियंत्रण मिळवले व किरकोळ प्रमाणात बाधितांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार शहरातील उद्योग व्यवसायांचा गाडा सुरू आहे. तर आता नवीन नियमावलीनुसार रात्री आठ वाजेपर्यंत काही प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची मुभा मिळाली आहे.

या दरम्यान मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर हे बंधनकारक केले असतानाही हे कोरोनाचे सर्व नियम गुंडाळत शहरात नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.
येथील किदवाई रोड, महंमदअली रोड, जुना व नवा आग्रा रोड, संगमेश्वर, कॅम्प रोड, सटाणा रोड आदी मुख्य रस्त्यावरील विविध दुकानांवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे काही मुख्य रस्ते गर्दीत हरवले आहेत. परिणामी येथे अनेक वेळा वाहतूककोंडी होत आहे, तर यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे.

या नवीन नियमावलीमुळे उसळलेल्या गर्दीमध्ये कोरोना नियमांचा विसर पडलेला दिसतो तर शहरातून कोरोना हद्दपार झाला की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. ही गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू नये एवढीच अपेक्षा मालेगावकर व्यक्त करीत आहेत.

 

Web Title: Roads lost in crowds due to unlock in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.