लासलगावचे रस्ते झाले निर्मनुष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:20 IST2020-05-03T21:19:23+5:302020-05-03T21:20:52+5:30
लासलगाव : शहर परिसरात तीन दिवस संचारबंदी कडक करण्यात आल्याने काही अपवाद वगळता नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लासलगावी तीन दिवस संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे शहरातील रस्ते असे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : शहर परिसरात तीन दिवस संचारबंदी कडक करण्यात आल्याने काही अपवाद वगळता नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.
लासलगावी दि. १ ते ३ मेपर्यंत वैद्यकीय व दूध वगळता सर्व सेवा पूर्णपणे बंद करून संचारबंदी अतिशय कडक करण्यात आली होती. या काळात भाजीपाला व किराणा दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. महाराष्टÑदिनी सकाळपासून तीन दिवसीय लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे भरदिवसा रस्त्यावर एक व्यक्तीही दिसून आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी संपूर्ण भारतभर लागू आहे.
लासलगाव शहरात या संचारबंदीचे काटेकोर पालन सुरु आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनाकारण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आजारपणाला न घाबरता बिनधास्त बाहेर फिरताना दिसून आले.
या तीन दिवसात कुणीही व्यक्ती रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याविषयी तसेच जी व्यक्ती घराबाहेर पडेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशा सूचना ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. या सूचनांचे मोठ्या प्रमाणात पालन करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व पोलिस कर्मचाऱ्यांनी संचारबंदी काळात परिश्रम घेताना दिसत आहेत.