घाटातील रस्त्याचे काम संथगतीने

By Admin | Updated: September 4, 2016 00:26 IST2016-09-04T00:23:51+5:302016-09-04T00:26:57+5:30

सप्तशृंगगड : भाविकांचे हाल

The road work in the ghat is slow | घाटातील रस्त्याचे काम संथगतीने

घाटातील रस्त्याचे काम संथगतीने


सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडाकडे जाणारा रस्ता गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वळणावर खचल्याने गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून घाटातील रस्त्याचे काम चालू आहे; पण हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने यामुळे गडावर जाण्यासाठी अवजड वाहनांना व बसेस यांना बंदी घालण्यात आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांबरोबरच भाविकांचे हाल होत आहेत.
गेल्या महिन्यात गडावर मुसळधार पाऊस पडल्याने यू टन वळणावरील घाटात रस्त्याच्या खालील मातीचा भराव वाहून गेला व तेथील संरक्षक भितींचे सीमेंटचे पोल अधांतरीच लटकले होते.
त्यामुळे बस व अवजड वाहंनाना बंदी करण्यात आली होती. याठिकाणचे काम करण्यासाठी एका ठेकेदारास ठेका दिला; पण गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून येथील काम संथगतीने सुरू असल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये तसेच विशेष करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम त्वरित
पूर्ण करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

Web Title: The road work in the ghat is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.