रस्त्याचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:15 IST2017-09-18T00:14:58+5:302017-09-18T00:15:19+5:30
येथील प्रभाग २८ मधील उपेंद्रनगर भागात मनपाच्या वतीने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मुख्य रस्त्याचे खोदकाम करण्याचे काम सुरू होते. सदरचे काम हे रस्त्याची आखणी न करताच खोदण्यात येत असल्याने यास महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. तसेच कामबंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

रस्त्याचे काम पाडले बंद
सिडको : येथील प्रभाग २८ मधील उपेंद्रनगर भागात मनपाच्या वतीने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मुख्य रस्त्याचे खोदकाम करण्याचे काम सुरू होते. सदरचे काम हे रस्त्याची आखणी न करताच खोदण्यात येत असल्याने यास महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. तसेच कामबंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सिडकोतील उपेंद्रनगर भागात आज सकाळी मनपाच्या वतीने मुख्य रस्ता जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदण्याचे काम सुरू होते. खोदकाम करताना रस्त्याची कोणतीही आखणी केलेली नव्हती. तसेच वाहने ये-जा करण्यासाठीदेखील काही फलक लावलेले नसल्याने आज मनसेच्या वतीने सदरचे काम बंद करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी कैलास मोरे, नितीन माळी, स्वप्नील भालेराव, अरुण वेताळ, प्रमोद गवळी, दादाजी पगारे, सुरेश सूर्यवंशी, आशिष मोरे, जगदीश बागुल, अनिल माधव आदी सहभागी झाले होते.