शेणवड गावाचा रस्ता बंद

By Admin | Updated: September 22, 2016 00:42 IST2016-09-22T00:42:15+5:302016-09-22T00:42:49+5:30

दहा किलोमीटरचा वळसा : ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय

The road to the village of Shenwalka closed | शेणवड गावाचा रस्ता बंद

शेणवड गावाचा रस्ता बंद

 घोटी : शहरापासूून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेणवड बुद्रुक या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व चाकरमान्यांचे हाल होत आहेत. घोटी येथे जाण्यासाठी दहा किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत आहे. या गैरसोयीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्यानंतर संबंधित विभाग जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे. घोटीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेणवड बु।। या गावाला मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने ग्रामस्थांना धरणाच्या बांधाचा रस्ता म्हणून वापर करावा लागत आहे. (वार्ताहर) काम अर्धवटच शेणवड बु।। गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी धरणाच्या पायथ्याजवळून सुमारे साडेतीन कोटी रु पये निधीच्या रस्त्याला शासनाकडून मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे काम सुरू झाले, मात्र सदरचे काम अर्थसंकल्पात नसल्याचे कारण पुढे करीत काम बंद पडले आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता तयार केला होता. मात्र या पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. यामुळे दहा किलोमीटर अंतराचा वळसा मारून घोटीला यावे लागते. या रस्त्याचे काम करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग सदर रस्ता आपल्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून दुरु स्तीचे काम करण्यास नकार देत आहे, तर जि. प. बांधकाम विभागही सदरचा रस्ता आपल्याकडे नाही असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Web Title: The road to the village of Shenwalka closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.