गुळवंच विद्यालयात रस्ता वाहतूक मार्गदर्शन
By Admin | Updated: January 11, 2016 23:03 IST2016-01-11T23:02:35+5:302016-01-11T23:03:59+5:30
गुळवंच विद्यालयात रस्ता वाहतूक मार्गदर्शन

गुळवंच विद्यालयात रस्ता वाहतूक मार्गदर्शन
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता वाहतूक
या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी प्रवास करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती दिली. वाहतुकीदरम्यान रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले असून, प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक मधुकर काळे यांनी सपकाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुनील जाधव, किशोर सानप यांचा सत्कार केला. चंद्रकांत घरटे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी भास्कर रेवगडे,
शरद केदार, दत्तात्रय रेवगडे,
संजय सानप, रवींद्र कांगणे,
ललित रत्नाकर, बाळकृष्ण सानप, मारुती सानप, छाया सांगळे,
सुरेखा जगताप आदिंसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)