Road to the street | सटाण्यात कांदाप्रश्नी रास्तारोको
सटाण्यात कांदाप्रश्नी रास्तारोको

सटाणा : कांदा लिलावास प्रारंभ न केल्याने संतप्त शेतकर्यांनी आज गुरु वारी (दि. ४) येथील मालेगाव रस्त्यावरील वाहतूक एक तास रोखून धरली. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने तात्काळ व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लिलाव सुरु केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. येथील बाजार समिती आवारात बुधवारी रात्रीपासून सटाणा, साक्र ी, मालेगाव, देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा विक्र ीस आणला होता. गुरु वारी सकाळी १० वाजता कांद्याचे लिलाव सुरु होणे अपेक्षित होते. मात्र पावणे बारा वाजले तरी देखील लिलाव सुरु न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अचानक एकत्र येत आपला मोर्चा मालेगाव रोडकडे वळवून ठिय्या दिल्याने एक तास वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलीस व बाजार समिती प्रशासनाने शेतकºयांशी चर्चा केली. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने व्यापारी वर्गाची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता प्रशासनाने प्रत्येक व्यापाºयाला ५० लाख रूपये बोजा चढविन्यासाठी लेखी सूचना दिल्या होत्या मात्र त्यांनी अमान्य करत लिलाव न करण्याची भूमिका घेतली होती. याबाबत बाजार समिती प्रशासनाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर लिलाव पूर्ववत केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


Web Title: Road to the street
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.