रस्त्याचा घोटाळा
By Admin | Updated: December 25, 2015 00:27 IST2015-12-25T00:07:49+5:302015-12-25T00:27:58+5:30
अजब कारभार : तयार रस्ता तासाभरात उखडला

रस्त्याचा घोटाळा
सिडको : येथील तिडकेनगर भागातील औदुंबर कॉलनी रो-हाऊसेस परिसरात महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र काही तास उलटत नाही मनपाने पुन्हा जेसीबी यंत्राद्वारे सदर रस्ता उखडून टाकल्याने यात लाखो रुपयांचा चुराडा झाला.
सदरची बाब नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना कळविल्यानंतर मनपाने हा रस्ता पुन्हा तयार करून दिला. विशेष म्हणजे ज्या भागातून रस्ता तयार करण्यात आला तेथील जागा एका खासगी बिल्डरची असल्याचे उघड झाले असून, मनपा अधिकारी व संबंधित बिल्डर यांच्यातील साटेलोटेमुळेच तयार केलेला रस्ता उखडून टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिडकेनगर येथील औदुंबर कॉलनी परिसरात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे यांच्या निधीतून कॉलनीत डांबरीकरणाचे काम आज सकाळी करण्यात आले.