शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्ता सुरक्षेचा जागर : जनप्रबोधनाकरिता १ हजार कि.मीच्या परिघात फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 14:57 IST

नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे.

ठळक मुद्देआरटीओचा पुढाकार अन‌् रायडर्स ग्रुपचा सहभागजनप्रबोधनपर कार्यक्रमही घेण्यात आले२५० दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत गावकऱ्यांचे लक्ष वेधले

नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या संख्येने अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचेही प्रमाण अधिक असल्याचे मागील वर्षाच्या आकडेवारीवरुन दिसून येते. यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण व्हावी, जेणेकरुन अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय 'बाईक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली' काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघातील विविध गावांमधून वाहतुक नियमांचे पालन करणाऱ्या सुमारे २५० दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ग्रामिण भागातील लोकांमध्ये दिवसेंदिवस रस्ते सुरक्षा आणि वाहतुक नियमांच्या पालनाविषयी वाढत चाललेली उदासिनता हे यामागील मुख्य कारण असल्याने यावर्षी नाशिक आरटीओकडून ग्रामीण भागात जनजागृती करण्याकरिता रविवारी (दि.७) ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १ हजार किलोमीटरच्या परिघात बाईक रॅली काढण्यात आली.

सकाळी आठ वाजता पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सुरेंद्र निकम, ड्रायव्हिंग स्कुलचे असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर जाधव, यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.बाईक रॅलीने ग्रामीण जनतेचे लक्ष वेधून घेत रस्ते सुरक्षेचे नियम व अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबतची माहितीपुस्तिका व माहिती पत्रकांचे ठिकठिकाणी वाटप करण्यात आले. तसेच विविध जनप्रबोधनपर कार्यक्रमही घेण्यात आले.असा होता रॅलीचा मार्ग२५० दुचाकीस्वारांची चार प्रमुख मार्गांवर विभागणी करण्यात आली होती.१) ओझर, पिंपळगाव, वडाळीभोई, चांदवड, मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण, दिंडोरी.२) सायखेडा, निफाड, विंचुर, लासलगाव येवला३)नाशिकरोड, शिंदे-पळसे, सिन्नर, वावी, नांदुरशिंगोटे४) गंगापुर, गिरणारे, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरीया बाईकर्स ग्रुपचा सहभागरॉयल हार्टेड, महिंद्र ए.आर.के.ऑटो, द रायडर्स ऑफ नाशिक, ग्रुझिंग गॉड‌्स ग्रुप, बाईकर्णी नाशिक ग्रुप, युनायटेड फिफ्टीनर्स, वाईनसिटी एचडी ग्रुप, मॅक्सरिस्ट या ग्रुपच्या दुचाकी रायडर्ससह विविध मोटर ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनचालकांनीही सहभाग नोंदविला. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिकRto officeआरटीओ ऑफीसbikeबाईकSuraj Mandhareसुरज मांढरेAccidentअपघात