शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आठ दिवसांत रस्ते दुरुस्तीचे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 11:58 PM

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीसह आगामी निवडणुकीच्या राखीव जागा संदर्भात महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली. या आधीचे ब्रिगेडियर पी.रमेश यांची मेजर जनरलपदी पदोन्नती निवड झाल्याने बोर्डाचे नवीन पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले ब्रिगेडियर अरविंद पी. धनंजयन यांच्यासह लष्कर नियुक्त सदस्य कर्नल पुनीत संघेरा व कर्नल अतुल बिश्त यांनी प्रथम गोपनियतेची शपथ घेतली.

ठळक मुद्देकॅन्टोन्मेंट बोर्ड : सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीसह आगामी निवडणुकीच्या राखीव जागा संदर्भात महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली. या आधीचे ब्रिगेडियर पी.रमेश यांची मेजर जनरलपदी पदोन्नती निवड झाल्याने बोर्डाचे नवीन पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले ब्रिगेडियर अरविंद पी. धनंजयन यांच्यासह लष्कर नियुक्त सदस्य कर्नल पुनीत संघेरा व कर्नल अतुल बिश्त यांनी प्रथम गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर बोर्डाच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला.बोर्डाची बैठक सुरुवात होताच, सर्व नगरसेवकांनी देवळालीसह परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाला धारेवर धरले व ताबडतोब सर्व रस्ते दुरुस्तीसह डांबरीकरण करण्याची मागणी केली. यावेळी सचिन ठाकरे यांनी भूमिगत गटारीचे काम लॅमरोडला न करण्याची नगरसेवकांची मागणी होती, मात्र तरीही हे काम ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असताना अजूनही ते पूर्ण झालेले नाही. ठेकेदार व प्रशासन एखाद्या अप्रिय घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, भूमिगत गटारीचे काम करताना निविदेतील अटीनुसार खोदाई करून पाइप टाकणे, सांध भरणे, चेंबर बांधणे व क्युरिंग करणे नंतर त्यातून सांडपाणी जाण्याची चाचणी करणे आदी कामे करणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून त्यातील एकाही अटीची आजपावेतो पूर्तता झालेली नाही, ज्या ज्या ठिकाणी भूमिगत गटारीच्या कामासाठी रस्ते खोदले गेले, ते पुन्हा न बुजविता त्यावर तेथीलच माती टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे सर्वत्र दिसून येतात, लामरोड, शिंगवे बहुला, संसरी लेन, महालक्ष्मीरोड येथून नागरिकांना जाताना त्रास होतो, त्यामुळे हे रस्ते तातडीने सदर ठेकेदाराकडून तयार करून घेणे आवश्यक आहे. यावर ब्रिगेडियर धनंजयन व मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार यांनी येत्या आठ दिवसांत या रस्त्यांची कामे करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले जाणार असल्याचे सांगितले.खासदार हेमंत गोडसे यांनी संसरी ग्रामपंचायतीला कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वतंत्र पाणीपुरवठा करावा, असे पत्र दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या नावे एक इंच व्यासाची पाइपलाइन असलेली स्टँड पोस्ट देण्यात येणार असल्याचे कटारिया यांनी सांगितले. डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेस्ट यांच्या पत्राची दखल बोर्डाने घेऊन आठही वॉर्डातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उघड्यावर शौच करण्यास बंदी असून, नागरिकांनी स्व-खर्चाने राहत्या घराच्या जागेवर शौचालय बांधावे. यासाठी अर्ज केल्यास तत्काळ परवानगी मिळेल. सभेस उपाध्यक्ष कटारियांसह ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, मीना करंजकर, आशा गोडसे, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार, निमंत्रित सदस्य आमदार सरोज अहिरे आदी उपस्थित होते.आगामी निवडणुकीच्या संदर्भात राखीव असलेल्या वॉर्ड क्रमांक एक व पाचचा प्रस्ताव तसेच दोन, तीन, सहा, सातमधील महिला आरक्षण संदर्भातील प्रस्ताव मंजूर करून सदन कमांडला पाठविण्यात आला.खोदलेला रस्ता माहीत नाहीभुयारी गटारीसाठी लॅमरोड साडेतीन किमीचा खोदलेला असताना बांधकाम विभागाचे अधिकारी हाच रस्ता फक्त ५४० मीटर खोदल्याचे सांगतात. त्यामुळे खोदलेला रस्ता नक्की किती किलोमीटर आहे हे बांधकाम विभागालाच माहीत नसल्याने नगरसेवक सचिन ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्तकेले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा