रस्त्याची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:31 IST2020-12-12T04:31:24+5:302020-12-12T04:31:24+5:30

रस्त्याच्या मधोमध बसथांबा नाशिक : द्वारकाकडून येणाऱ्या बाहेरगावच्या एस.टी. बसेसला गडकरी चौक थांबा देण्यात आलेला आहे. या बसेस एस.टी. ...

Road repairs | रस्त्याची डागडुजी

रस्त्याची डागडुजी

रस्त्याच्या मधोमध बसथांबा

नाशिक : द्वारकाकडून येणाऱ्या बाहेरगावच्या एस.टी. बसेसला गडकरी चौक थांबा देण्यात आलेला आहे. या बसेस एस.टी. महामंडळाच्या डिव्हिजन कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरलाच उभ्या केल्या जात आहेत. रस्त्यात बसेस उभ्या केल्या जात असल्यामुळे शिंगाडा तलाव तसेच एन.डी. पटेल रोडकडून येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

पदपथावर फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण

नाशिकरोड : नाशिकरोड, दुर्गा उद्यान येथील पदपथावर फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. या मुख्य मार्गावर तसेच बिटको रुग्णालयाकडे जाणाऱ्या पदपथावरदेखील फळ तसेच भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने पदपथ नेमका कुणासाठी, अता प्रश्न निर्माण झाला आहे. विक्रेत्यांना येथील भाजीबाजारात जागा असतानाही विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहेत.

बोधलेनगर आंबेडकरवाडी रस्त्याची दुर्दशा

नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील बोधलेनगरमधील अंतर्गत आंबेडकरवाडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्ताचे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असून, अर्धवट बुजविण्यात आल्यामुळे रस्ता नादुरुस्त झाला आहे. रस्त्याच्या कडेलादेखील अनेक ठिकाणी रस्ता मातीचे बुजविलेला असल्याने रस्त्याची दुर्दशा झाल्याचे दिसते.

Web Title: Road repairs