रस्तादुरुस्तीची मागणी
By Admin | Updated: December 4, 2015 21:51 IST2015-12-04T21:50:46+5:302015-12-04T21:51:16+5:30
रस्तादुरुस्तीची मागणी

रस्तादुरुस्तीची मागणी
नवी बेज : राज्यमार्ग क्र. १७च्या कळवण - बेज रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. कळवण-बेज-सटाणा हा रस्ता राज्यमार्ग क्र. १७ म्हणून संबोधला जातो. कळवण-सटाणा दरम्यानचे अंतर कमी होत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे कळवण ते सटाणादरम्यान नव्याने काम करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा लक्ष देण्यात आलेले नाही.
आज या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना सर्कस करीत वाहने चालवावी लागतात. या रस्त्याने आतापर्यंत अपघातात दोन जणांचे बळी घेतले असून, संबंधितांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)