२६७ शिक्षकांना पदोन्नतीचा मार्ग सुकर शिक्षण मंडळ : सेवापुस्तक शिबिर
By Admin | Updated: May 27, 2014 01:18 IST2014-05-27T01:02:01+5:302014-05-27T01:18:55+5:30
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या सेवापुस्तकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून, २६७ शिक्षकांच्या पदोन्नत्या मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सेवापुस्तके भरण्याच्या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले.

२६७ शिक्षकांना पदोन्नतीचा मार्ग सुकर शिक्षण मंडळ : सेवापुस्तक शिबिर
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या सेवापुस्तकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून, २६७ शिक्षकांच्या पदोन्नत्या मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सेवापुस्तके भरण्याच्या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले.
महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांचे सेवापुस्तक पूर्ण करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या पार्श्वभूमीवर ९ ते २८ मे दरम्यान, सेवापुस्तक भरण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २८ मेपर्यंत चालणार आहे. आत्तापर्यंत ९७९ शिक्षकांना त्यांनी केलेल्या सेवांतर्गत विशेष कार्याचा, प्रशिक्षणाचा तसेच अधिक शैक्षणिक पात्रता वाढविल्याने त्यांना सेवाज्येष्ठतेचा फायदा मिळणार आहे. शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर, प्रशासक दत्तात्रेय गोतिसे यांनी शिक्षक सेनेच्या मागणीला प्रतिसाद देऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोमवारी महापौर ॲड. यतिन वाघ, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, गटनेता अशोक सातभाई, नगरसेवक यशवंत निकुळे, संदीप लेनकर यांनी या शिबिरास भेट देऊन कौतुक केले. यावेळी मनसे शिक्षक सेनेचे अध्यक्ष दीपक पगार, सचिव सगीर शेख, उपाध्यक्ष सुरेश खांडबहाले, शिवाजी शिंदे, कोषाध्यक्ष अविनाश कोठावदे, पंकज पवार, मुकुंद बोढाई, वाय. के. जाधव, सुनील पवार, अशोक हिंगमिरे, भाऊसाहेब थोरात, नाना चौधरी आदि उपस्थित होते.