शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

रस्ता की मृत्यूचा सापळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:51 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे-लोणी महामार्ग : जीवघेणा प्रवास; दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त

नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.सिन्नर - संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून हा महामार्ग जात आहे. सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता हा सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे. या भागातच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवाशी व वाहनचालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहेत. नांदूरशिंगोटे - लोणी महामार्गावर पळसखेडे, निमोण, पिंपळे, नानज, तळेगाव, वरझडी, लवारे-कसारे आदी गावे येत असून, या भागातील नागरिकांचा दोन्ही तालुक्यांशी दररोजचा संपर्क येत असतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.शिर्डी येथील साईबाबा मंदिर, शनिशिंगणापूर, मढी, मोहटादेवी, तसेच कोपरगाव व अहमदनगर येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा व सोयीचा असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मार्गाने अवजड वाहनाची वर्दळ मोठी असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे.परिसरात मोठी बाजारपेठ तसेच कांद्याचे उपबाजार असल्याने या ठिकाणी व्यापारी, दुकानदार, शेतकरी, शालेय विद्याथी आदींसह चाकरमनांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टीगेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात या रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे-थे आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर डिसेंबर महिन्यात जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याची मलमपट्टी केली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. महिला, प्रवाशी, रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.खासगी वाहनाचा जाण्यास नकार !गेल्या अनेक महिन्यांपासून नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता खराब झाल्याने खासगी वाहनचालक निमोण व तळेगाव भागाकडे जाण्यासाठी टाळाटाळ करतात. कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तसे वाहनधारकांनाही मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक