हिरावाडी येथे घरफोडीत सात तोळे सोन्यासह रोकड लंपास

By Admin | Updated: October 16, 2015 22:53 IST2015-10-16T22:48:00+5:302015-10-16T22:53:12+5:30

हिरावाडी येथे घरफोडीत सात तोळे सोन्यासह रोकड लंपास

Road lock with seven tola gold with a burglar at Hirawadi | हिरावाडी येथे घरफोडीत सात तोळे सोन्यासह रोकड लंपास

हिरावाडी येथे घरफोडीत सात तोळे सोन्यासह रोकड लंपास

पंचवटी : हिरावाडी रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) घडली आहे़ हिरावाडी रोडवर रामकृष्ण बाबूराव शिंदे यांचा रामरत्न बंगला आहे़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मंदिरात गेली होती़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व आतील कपाटातील सात तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता़
उपनगरला जुगार अड्ड्यावर छापा
देवळाली गावातील बाजार आवारातील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चौघा संशयितांना उपनगर पोलिसांनी पकडले़ गुरु वारी (दि.१५) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास संशयित पद्माकर सोनू गवळी, सनी दत्तू सकट, दिला प्रकाश जाधव व खंडू देवीदास लोंढे हे जुगार खेळत होते़ उपनगर पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे़
उपनगरला इसमाची आत्महत्त्या
उपनगर परिसरातील सप्तशृंगी रुग्णालयाजवळील माधव बंगल्यात राहणारे हेमंत माधवराव भुजबळ (३१) यांनी गुरुवारी (दि़ १५) सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Road lock with seven tola gold with a burglar at Hirawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.