दोन महिन्यांपासून रस्ता खोदलेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:19+5:302021-04-11T04:14:19+5:30

गेल्या महिन्याभरापासून शहरात ठिकठिकाणी गॅस पाइपलाइनसाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील खोदकामासाठी वाहतूक वळविण्यात येत असून, कोणतीही ...

The road has been dug for two months! | दोन महिन्यांपासून रस्ता खोदलेलाच !

दोन महिन्यांपासून रस्ता खोदलेलाच !

Next

गेल्या महिन्याभरापासून शहरात ठिकठिकाणी गॅस पाइपलाइनसाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील खोदकामासाठी वाहतूक वळविण्यात येत असून, कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या महिन्याभरात झालेल्या अपघातात दोघांचा हकनाक बळी गेला आहे. शिवाय नियोजन नसल्याने वारंवार रस्ता खोदण्यात येत आहे. हे काम अतिशय धीम्यागतीने सुरू असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना महिन्याभरापासून आपले व्यवसाय बंद ठेवावे लागत आहे. हे खोदकाम लवकरात लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद पाटील, बद्री आलम, डॉ. विजय सिन्हा, विधाते, वशिष्ठ शर्मा, रणजित सिंग आदींसह नागरिकांनी केली आहे.

(फोटो १० रोड)

Web Title: The road has been dug for two months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.