कोट्यवधी रुपयांचे पुन्हा खोदणार रस्ते

By Admin | Updated: July 3, 2017 00:31 IST2017-07-03T00:31:23+5:302017-07-03T00:31:40+5:30

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सुविधा देण्यात येणार आहे.

Road to excavate billions of rupees | कोट्यवधी रुपयांचे पुन्हा खोदणार रस्ते

कोट्यवधी रुपयांचे पुन्हा खोदणार रस्ते

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सुविधा देण्यात येणार असून, अशा सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे रस्ते खोदावे लागणार आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून संपूर्ण शहरात फायबर आॅप्टिकल केबलचे जाळे विणण्यासाठी हा प्रकार करावा लागणार आहे. सिंहस्थात दोन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेले गुळगुळीत रस्ते खोदावे लागणार असल्याने पुन्हा हेच रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेलाही कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
नाशिक शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्यानंतर नूतनीकरणाच्या काही कामांना स्पेशल परपज व्हेईकल कंपनीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता कामे सुरू होत असली तरी मुख्य काम शहराला तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट करायचे असल्याने नाशिक शहरात फायबर आॅप्टिकल केबलचे जाळे विणावे लागणार आहे. अशाप्रकारचे फायबर आॅप्टिकल केबलचे जाळे संपूर्ण शहरभर विणल्यानंतर त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी हे खोदकाम केले जाणार आहे. राज्य शासनाने स्मार्ट सिटीअंतर्गत अशाप्रकारच्या सेवा देण्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ कामकाज करीत असून, त्याअंतर्गत नाशिकमध्ये साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये यापूर्वीच अशाप्रकारचे काम झाले असून, त्यानंतर आता नाशिकमध्ये असेच काम करण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांच्या उपस्थितीत नाशिकला प्राथमिक बैठकही झाली आहे. नाशिकमध्ये यापूर्वी २०१२-१३ मध्ये रिलायन्स कंपनीने अशाप्रकारे फायबर आॅप्टिकल टाकण्यासाठी खोदकाम केले होते.

Web Title: Road to excavate billions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.