पाथर्डी परिसरात पथदीप बंद; अंधाराचे साम्राज्य
By Admin | Updated: August 12, 2016 23:41 IST2016-08-12T23:41:26+5:302016-08-12T23:41:38+5:30
पाथर्डी परिसरात पथदीप बंद; अंधाराचे साम्राज्य

पाथर्डी परिसरात पथदीप बंद; अंधाराचे साम्राज्य
पाथर्डी फाटा : पाथर्डी ते फाळके स्मारक दरम्यानच्या पूर्वेकडील सर्व्हिस रस्त्यावरचे बहुसंख्य पथदीप बंद असून, रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. हे पथदीप दुरु स्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पाथर्डी फाटा ते फाळके स्मारक दरम्यान पूर्वेकडच्या समांतर रस्त्यावरचे अनेक पथदीप नादुरु स्त, काही तुटलेले तर काही खांबांवर लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. बंद पथदीपांमुळे या रस्त्यावर रात्री अंधाराचे साम्राज्य असते. पावसाळ्यामुळे या गडद अंधारातून जाताना परिसरातील नागरिक, महिला व तरु णींना भीती वाटते. महामार्गालगत कवठेकरवाडी व काही मोलमजुरी करणाऱ्यांची वस्ती असल्याने रात्री कामावरून घरी परतताना काळोखात जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याच रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांचीही मोठी संख्या असते. पांडवलेणीला जाणारेही भल्या सकाळी या रस्त्याने चालत जाताना आणि सायकलपटूंनाही अंधारात चाचपडत जावे लागते. मनपाच्या संबंधित यंत्रणेने येथील पथदीप त्वरित दुरु स्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)