जलाराम सोसायटीसमोर खड्डा पडल्याने रस्ता बंद
By Admin | Updated: July 24, 2016 23:38 IST2016-07-24T23:35:00+5:302016-07-24T23:38:30+5:30
जलाराम सोसायटीसमोर खड्डा पडल्याने रस्ता बंद

जलाराम सोसायटीसमोर खड्डा पडल्याने रस्ता बंद
नाशिक : शहरातील द्वारका येथील जय जलाराम सोसायटीसमोरील रस्त्यावर पावसामुळे खड्डा पडल्याने १५ दिवसांपासून रहिवाशांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या परिसरातील ड्रेनेजच्या समस्येमुळे गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना दुर्गंधाचा सामना करावा लागत
आहे.
सोसायटीतील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या रस्त्यावरील खड्ड्यांचे व ड्रेनेज दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गतवर्षी पाइपलाइन टाकण्यात आली असून ते काम अपूर्ण आहे. तसेच सोसायटी परिसरात पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील मागणी होत आहे. (प्रतिनिधी).