पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ
By Admin | Updated: January 14, 2017 00:54 IST2017-01-14T00:54:02+5:302017-01-14T00:54:13+5:30
गतिरोधक टाकावे : नवदुर्गा मित्रमंडळाची मागणी

पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत साईबाबा मंदिरासमोर लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी नवदुर्गा मित्रमंडळाने केली आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यादरम्यान कलानगर ते पाथर्डीगाव या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्यामध्ये खजुराचे वृक्ष लावून सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच वाहतूक सुरळीत झाली आहे. या रस्त्यालगतच कलानगर, सार्थकनगर, वनवैभव कॉलनी, सदिच्छानगर, समर्थनगर, शरयूनगरसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत व देवळाली कॅम्पला ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.
जीवितहानीची होऊ नये म्हणून तातडीने गतिरोधक टाकावा, अशी मागणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, अरुण पवार, सुनील गांगुर्डे, विश्वनाथ पवार, संजय राव, कैलास शिंदे यांनी केली आहे. (वार्ताहर)