शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

शाळा सुरू करण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:57 IST

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र : कोरोनाचा सामना करण्यास सक्षम नसल्याचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे धोकादायक ठरू शकेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले असून प्रथम नाशिक आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्तझाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी टीव्ही, वर्कबुक, अ‍ॅक्टिव्हिटी बुक, प्री-लोडेड टॅब अशा सगळ्या पयार्यांचा विचार करण्याची गरज असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या आहे.परंतु, बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ एंड न्यूरो-साइंसेज संस्थेने मोबाइल किंवा आॅनलाइन शिक्षण देणे हे मुलांच्या आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट केल्याचा दाखला देत खासगी शाळांनी सुरू केलेल्या आॅनलाइन शिक्षणाच्या माऱ्यालाही तत्काळ वेसण घालण्याचे आवाहनही मुख्याध्यापक संघाने यापत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केले आहे.वर्कबुक, अ‍ॅक्टिव्हिटी बुक हाच पर्यायराज्यातील १५ टक्के घरात साधा टीव्हीदेखील नाही आणि स्मार्टफोनही ४० टक्के घरात नाही. ही बाब लक्षात घेता वर्क बुक आणि अ‍ॅक्टिव्हिटी बुक हाच पर्याय योग्य ठरू शकतो असा सल्ला मुख्याध्यापक संघाने दिला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.जुलैअखेरपर्यंत वर्क बुक आणि अ‍ॅक्टिव्हिटी बुक तिमाही पद्धतीने छापून ती राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत घरपोच देण्यात यावीत, तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री-लोडेड टॅब देणे शक्य असल्यास त्याबाबत शासनाने निर्णय करावा, अशी मागणीही मुख्याध्यापक संघाने केली आहे.शासकीय निर्णयानुसार१ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था आहे. या समित्यांच्या चर्चेतून कोणत्याही ठोस निर्णय घेता येत नाही.-अनिल पवार, मुख्याध्यापक, सारडा विद्यालय, सिन्नर सध्या शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आशा स्थितीत एक जुलैपासून शाळा सुरू करणे योग्य नाही. ही भयानक स्थिती आटोक्यात आल्यानंतरच याबाबत निर्णय घ्यावा, शिक्षक सुटीच्या दिवशीही शाळा चालवून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतील. मात्र सध्याच्या संकटाला सामोरे जाण्यास मुख्याध्यापक सक्षम नाही.- एस. बी. देशमुख, सचिव,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघसध्याची कोविड १९ चा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत विद्यार्थी शाळेत आल्यास फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन होऊ शकणार नाही. त्यामुळे जुलैपासून शाळा सुरु केल्यास हा प्रादुर्भाव अधिकच वाढण्याची शक्यता असताना शासनाने शाळाला सुरु करण्याचा धोका पत्करू नये.- एस. के. सावंत, अध्यक्ष,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन