उडड्या गटारींमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 15:27 IST2020-01-15T15:27:03+5:302020-01-15T15:27:40+5:30
सुरगाणा - येथील पाच नंबर वार्ड मधील गटारींचे उघडे असलेले चेंबर ढापे टाकून झाकण्याची वेळोवेळी संबंधितांकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने खेळणाऱ्या लहान मुलांसाठी हे चेंबर धोकादायक ठरले आहेत.

उडड्या गटारींमुळे धोका
खेळताना या उघड्या चेंबरमध्ये पडून दूर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे. या चेंबरसह अन्य चेंबरवर ढापे टाकून गटार झाकण्याची मागणी संबंधित ठेकेदाराकडे गेल्या सात आठ महिन्यांपासून केली जात असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही ठिकाणी चेंबर लहान आणि वरु न टाकण्यात येणारी जाळी मोठी झाली असल्याने वरचेवर जाळी ठेवण्यात आली आहे. सदर रस्त्याची पहाणी करण्यासाठी दोन वेळा वरिष्ठ अधिकारी देखील येऊन गेले. या अर्धवट कामांकडे त्यांचे देखील दूर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित ठेकेदाराकडे व त्यांच्या सहकारींकडे देखील चेंबरवर जाळी टाकण्याबाबत वेळोवेळी सांगण्यात आले. . याबाबत मुख्याधिकारी माने यांना देखील सांगण्यात आले. मात्र त्यांनीही सांगतो बघतो यापलीकडे काही केले नाही. लहान मुले खेळत असल्याने उघड्या चेंबरवर त्विरत जाळी टाकून गटार झाकण्याची मागणी केली जात आहे