पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षाचालकांना घरभाडे भरणेही झाले मुश्किल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST2021-02-18T04:25:33+5:302021-02-18T04:25:33+5:30
कोट - रिक्षा व्यवसाय करणे आता खूपच कठीण होऊन बसले आहे. पेट्रोलचे दर वाढले तरी प्रवासी मात्र १० ते ...

पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षाचालकांना घरभाडे भरणेही झाले मुश्किल
कोट -
रिक्षा व्यवसाय करणे आता खूपच कठीण होऊन बसले आहे. पेट्रोलचे दर वाढले तरी प्रवासी मात्र १० ते १५ रुपये सीटची अपेक्षा धरतात. अनेकजण रिक्षात बसत नाहीत. यामुळे रोजचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. आमच्या अनेक सहकाऱ्यांनी सुरक्षारक्षकासह मिळेल ती नोकरी धरली आहे. काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
- महेश दंडगव्हाळ, रिक्षाचालक, जेलरोड
कोट -
पेट्रोलपेक्षा एलपीजी गॅस काही प्रमाणात स्वस्त असल्यामुळे सध्या तरी या रिक्षा चालविणे परवडते. मात्र, अपेक्षित व्यवसाय होत नाही. यामुळे जेवढे मिळेल त्यात समाधान मानावे लागते. अनेक रिक्षाचालक पार्टटाईम नोकरी करून घरखर्चाला हातभार लावतात. केवळ रिक्षा व्यवसायावर भागत नाही. - गणेश वाघ, रिक्षाचालक, नाशिक
कोट-
पेट्रोलचे दर इतके वाढले आहेत की, रिक्षाचा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. प्रवासी वाढीव भाडे देत नाहीत. यामुळे पूर्वी होणाऱ्या व्यवसायापेक्षा आता ५० टक्केही व्यवसाय होत नाही. घरखर्चाबरोबर घरभाडे भरणेही कठीण झाले आहे.
- गोविंद गवते, रिक्षाचालक, नाशिक
पेट्रोलचे दर (प्रतिलीटर)
१ डिसेंबर -८९.४४
१ जानेवारी - ९०.७६
१ फेब्रुवारी - ९३.२८
शहरातील रिक्षांची संख्या
पेट्रोल -१२०००
डिझेल - ३०००
एलपीजी - २०००