वाढत्या खत महागाईचा शेतीवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST2021-05-18T04:15:52+5:302021-05-18T04:15:52+5:30

इगतपुरी : कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, शेती मालाचे झालेले ...

Rising fertilizer inflation will affect agriculture | वाढत्या खत महागाईचा शेतीवर होणार परिणाम

वाढत्या खत महागाईचा शेतीवर होणार परिणाम

इगतपुरी : कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, शेती मालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे हाती आलेला शेती माल बेभाव विकावा लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा या वर्षीही अनुभवत आहे.

आताही कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन, पिकलेल्या शेतीमालाला बेभाव विकावे लागत आहेत. या नैराश्यग्रस्त परिस्थितीतून सावरत शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरिपाच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू केली आहे. खरीप हंगाम येऊन ठेपल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे.

मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत. एकीकडे शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी सर्वसाधारणपणे खरिपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते.

तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील काड्या, फने, नांगरणी, भाजणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. पेरणीसाठी वेळेवर अडचण येऊ नये म्हणून शेतकरी मे महिन्यापासून बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात.

तालुक्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी वेळेवर धांदळ होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात.

यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केला जात आहे. एका गोणी माघे जवळपास ५०० ते ६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. यावर्षी खताचे भाव वाढल्याने शेती करावी की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डीएपीसोबत इतर सर्वच मिश्र खतांच्या किमती वाढल्या आहेत. सुपर फॉस्फेट पोटॅश आदी खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

खताच्या किमतीसोबतच तणनाशक, कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेतमालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहेत. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दरदेखील वाढवले आहेत.

अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे. बहुतेक शेतकरी आता आंतर मशागत नांगरणी, फंटण, रोटावेटर आदी कामे ट्रॅक्टरने करतात; पण आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार आहे.

( १७ इगतपुरी)

खतांचे जुने भाव व नवीन भाव.

===Photopath===

170521\17nsk_31_17052021_13.jpg

===Caption===

खतांचे जुने भाव व नवीन भाव.

Web Title: Rising fertilizer inflation will affect agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.