नांदगावला प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर रिपाइंचे बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 22:56 IST2021-09-27T22:54:59+5:302021-09-27T22:56:38+5:30
नांदगाव, : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. यंत्रणेच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने ३० सप्टेंबरला तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

नांदगावला प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर रिपाइंचे बोट
नांदगाव, : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. यंत्रणेच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने ३० सप्टेंबरला तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर (नाना) जाधव, विलास कोतकर, गौतम काकळीज यांनी याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन धांडे यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, दळणवळण सुलभ व्हावे व जनतेचा शहराशी जनसंपर्क राहावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सब-वेमधील तांत्रीक अडचणी व अतिक्रमणे याबाबत महसूल, पोलीस आणि पालिका प्रशासन या सर्वच प्रशासकीय स्तरावर उदासीनतेची भूमिका असल्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत.
सर्वसामान्य जनतेला वेठीला धरले जात असून, जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. गंभीर रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी चार किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. या विषयावर महसूल पालिका आणि पोलीस यांच्या पातळीवर धोरणात्मक उपाययोजनांना चालना मिळत नाही, असे दिसून येते त्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फोटो- २७ नांदगाव निवेदन
नांदगावचे मुख्याधिकारी विवेक धांडे याना मागण्यांचे निवेदन देताना रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव.