येवल्यात शहर पोलिसांकडून दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST2021-09-02T04:32:18+5:302021-09-02T04:32:18+5:30

येवला : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक केले. शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय क्रीडांगणावर मंगळवारी (दि. ३१) ...

Riot control demonstration by city police in Yeola | येवल्यात शहर पोलिसांकडून दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक

येवल्यात शहर पोलिसांकडून दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक

येवला : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक केले.

शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय क्रीडांगणावर मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन गटांत दंगल झाली असल्याचा फोन येवला शहर पोलिसांना येतो. त्याक्षणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल होतात. या दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल होतात.

परिसरातील नागरिक या फौजफाट्यामुळे घाबरले असताना हा प्रकार पोलिसांकडून आयोजित दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक असल्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांनी जाहीर केल्याने सुटकेचा नि:श्वास टाकतात.

शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस व इतर यंत्रणा किती कार्यक्षम पद्धतीने काम करते हे पाहण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट केले गेले.

या प्रात्यक्षिकात पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, चंद्रकांत निर्मळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

(०१ येवला पोलीस)

010921\01nsk_53_01092021_13.jpg

येवल्यात शहरपोलिसांकडून दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक.

Web Title: Riot control demonstration by city police in Yeola