शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

ध्वनिक्षेपकाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:03 IST

विधानसभा निवडणुकीत प्रचाराची राळ चांगलीच उडाली आहे. प्रचार अखेरच्या चरणाकडे सरकत असतानाच प्रचारातील आक्रमकता आणि वेगही वाढला असून, जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या विविध प्रकारच्या तीन हजारांपेक्षा जास्त परवानग्या काढण्यात आलेल्या आहेत. नांदगाव आणि मालेगाव मध्यमध्ये ध्वनिक्षेपकाच्या सर्वाधिक परवानग्या असून, येवला आणि नाशिक पश्चिम मतदारसंघांमध्ये चौक सभांच्या जवळपास दीडशे परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.

ठळक मुद्देप्रचाराची परवानगी : नाशिक पश्चिम, येवल्यामध्ये चौक सभा अधिक

नाशिक : विधानसभा निवडणुकीत प्रचाराची राळ चांगलीच उडाली आहे. प्रचार अखेरच्या चरणाकडे सरकत असतानाच प्रचारातील आक्रमकता आणि वेगही वाढला असून, जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या विविध प्रकारच्या तीन हजारांपेक्षा जास्त परवानग्या काढण्यात आलेल्या आहेत. नांदगाव आणि मालेगाव मध्यमध्ये ध्वनिक्षेपकाच्या सर्वाधिक परवानग्या असून, येवला आणि नाशिक पश्चिम मतदारसंघांमध्ये चौक सभांच्या जवळपास दीडशे परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी निवडणूक शाखेच्या अंतर्गत एक खिडकी योजना सुरू आहे. या खिडकी योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना प्रचारासाठी लागणाºया विविध प्रकारच्या परवानग्या दिल्या जात आहेत. गेल्या सोमवारपर्यंत विविध प्रकारच्या प्रचाराच्या ३ हजार १८२ इतक्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. प्रचाराचा हा झंझावात येत्या दोन दिवसांत आणखी वाढणार असल्याने निवडणूक शाखेवर याचा अधिकाधिक ताण येणार आहे. त्यामुळे एक खिडकी योजनेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने आलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांमध्ये मालेगाव मध्य, येवला आणि नाशिक पश्चिम येथे सर्वाधिक सभा आणि चौक सभांचे नियोजन करण्यात आल्याने या तीनही मतदारसंघांमध्ये चौक सभांची सर्वाधिक परवानी देण्यात आलेली आहे. मालेगाव मध्यमध्ये ७७, बागलाणला १३, येवला येथे १६० तर नाशिक पश्चिममध्ये १२९ विविध प्रकारच्या सभा होणार आहेत. त्यासाठीच्या रीतसर परवानग्या तेथील उमेदवारांनी घेतलेल्या आहेत. सभेच्या ठिकाणी लावण्यात येणारे झेंडे आणि पोस्टर्सच्या बाबतीतही उमेदवारांनी अधिकृतरीत्या ९५८ इतक्या परवानग्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मालेगाव मध्यमध्ये ७६, बागलाणला २२०, सिन्नरला २१३, नाशिक मध्य मतदारसंघात ३०७ तर नाशिक पश्चिम मतदारसंघात ११० इतक्या झेंडे, पोस्टर्ससाठी परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे देवळालीत मोठी सभा नसल्याने त्यांनी सभेसाठी झेंडे, बॅनर्सची अद्याप रीतसर परवानगी घेतलेली दिसत नाही. सभा नसलेले असे सहा मतदारसंघ आहेत.प्रचारासाठी लागणाºया वाहनांच्या सुमारे साडेतीनशे परवानग्या उमेदवारांनी घेतलेल्या आहेत. प्रचारासाठी वाहन वापरणाºयांमध्ये नांदगाव मतदारसंघातील उमेदवारांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी एकूण ७७ वाहनांना प्रचाराची परवानगी देण्यात आली आहे. नांदगावला ७७, मालेगाव मध्यमध्ये १६, मालेगाव बाह्यमध्ये ३, बागलाण ३९, येवला २३, सिन्नर २३, नाशिक पूर्व २२, नाशिकमध्ये १०, तर नाशिक पश्चिममध्ये ६० वाहनांची परवानगी घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात लहान-मोठ्या जवळपास ३५० वाहनांची परवानगी देण्यात आलेली आहे. फलक लावण्यासाठीदेखील अधिकृत परवानगी घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ९५८ फलकांना तर ७५४ खासगी जागेवर फलक लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.१४८ मिरवणुकांची परवानगीनिवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना प्रचारासाठी लागणाºया परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केलेली आहे. प्रचार सभा, प्रचार रॅली, वाहनपरवाना, प्रचार कार्यालय परवाना एक खिडकी योजनेतून दिला जातो. त्यानुसार जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून मिरवणुकांसाठी १४८ परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात विविध प्रकारच्या एकूण ३१८२ परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.निवडणूक रिंगणात असलेल्या सुमारे १४८ उमेदवारांनी अधिकृतपणे ८० प्रचार कार्यालयांची परवानगी घेतलेली आहे. प्रचार कार्यालय सुरू करण्यासाठी निवडणूक शाखेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार निवडणूक शाखेच्या एक खिडकी योजनेतून गेल्या १४ तारखेपर्यंत केवळ ८० प्रचार कार्यालयांची परवानगी देण्यात आलेली आहे.२विधानसभा मतदारसंघाची एकूण व्याप्ती आणि लाखाच्या जवळपास मतदारसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात प्रचार कार्यालयांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे; परंतु अधिकृत आकडेवारी मात्र केवळ ८० इतकीच दिसते. निवडणुकीत राजकीय पक्षांचे उमेदवार असो की अपक्ष उमेदवार प्रत्येकाचे एखादे तरी प्रचार कार्यालय असते. जिल्ह्यातील एकूणच चुरस लक्षात घेता प्रचार कार्यालयांची संख्या मोठी असण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय