सिन्नर तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:27+5:302021-08-20T04:19:27+5:30
भिकुसा हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सिन्नर : येथील भिकुसा हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयात स्नेहल ...

सिन्नर तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम
भिकुसा हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव
सिन्नर : येथील भिकुसा हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयात स्नेहल बिन्नर (प्रथम), प्रेरणा घोरपडे (द्वितीय) आणि प्रतीक्षा भाबड (तृतीय) या विद्यार्थिनींचा मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार केला. प्रभाकर बोडके यांनी सूत्रसंचालन तर जयवंत महाले यांनी आभार मानले. यावेळी पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिनेश कापडणे, माता पालक संघाचे उपाध्यक्ष संगीता माळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सिन्नर बसस्थानकातून वृद्ध बेपत्ता
सिन्नर : नगर-श्रीगोंदा बसमधून उतरलेले ८५ वर्षीय वृद्ध बेपत्ता झाले आहेत. भाऊसाहेब श्रीपत पवार (रा. सुपे) हे बसमधून दि. १६ ऑगस्ट रोजी खाली उतरले. बसस्थानकातील सीसीटीव्हीमध्ये ते उतरल्याचेही दिसतात. मात्र, त्यांचा शोध घेऊनही तपास लागला नाही. याबाबत माहिती असल्यास पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संभाजी राजे यांचे स्वागत
सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे छत्रपती युवराज संभाजी राजे यांचे सिन्नर नगरीत मराठा क्रांती मोर्चा व शिवजन्मोत्सव समितीकडून स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी दत्ता वायचळे, राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, आनंदा सालमुठे, प्रा. राजाराम मुंगसे, सुभाष कुंभार, जयराम शिंदे, उमेश गायकवाड, डॉ. विष्णू अत्रे, राजेंद्र जगझाप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.