दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करणार

By Admin | Updated: July 30, 2016 21:24 IST2016-07-30T21:14:25+5:302016-07-30T21:24:36+5:30

दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करणार

Rigorous action will be taken against the guilty teacher | दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करणार

दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करणार

 पांडाणे : बोरवण पाडा (ता. दिंडोरी) येथील पीडित बालिकेची व कुटुंबीयांची जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे व आमदार नरहरी झिरवाळ यांनी घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले व दोषी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई केली केली जाईल, असे आश्वासन दिले.
बोरवण पाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर याच शाळेतील शिक्षक वाय.बी. बोरील याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यावर सदर शिक्षकास रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या संतापजनक घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, शनिवारी (दि.३०) जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, पंचायत समिती सभापती अलका चौधरी, सदस्य मीराबाई गांगोडे, भास्कर भगरे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष संगीता राऊत आदिंसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बोरवण पाडा येथे भेट देऊन माहिती घेतली. तसेच शाळेतील इतर विद्यार्थिनींकडूनही घटनेची माहिती घेतली. (वार्ताहर)

Web Title: Rigorous action will be taken against the guilty teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.