शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांची मुजोरी; व्यावसायिकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:24 IST

कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़

नाशिक : कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे (रा. संत कबीरनगर) विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील रिक्षाचालकांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे़  आनंदवलीतील रिअल इस्टेट व्यावसायिक सचिन अशोक गणोरे हे रविवारी (दि.२९) रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून (एमएच ४० केआर ६६६६) कुटुंबीयांसोबत जात होते. कॉलेजरोडवरील भोसला टी पॉइंटजवळ संशयित प्रल्हाद बनसोडे याने उलट्या दिशेने येत कारला (एमएच १५ झेड ४१८६) रिक्षाने कट मारला़ याबाबत गणोरे यांनी रिक्षचालकास जाब विचारला असता त्याने इतर रिक्षाचालकांच्या मदतीने गणोरे यांच्यावर हल्ला करून कुटुंबीयांनाही शिवीगाळ केली़  शहरात काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी, महिलांची छेडछाड, विद्यार्थिनींचा पाठलाग या तक्रारी वाढल्या आहेत़ पोलिसांकडून अशा मुजोर रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा