प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:31 IST2020-07-24T17:31:33+5:302020-07-24T17:31:48+5:30
मालेगाव: शहरात लॉकडाऊन नंतर निर्बंध कमी झाल्याने मालेगाव हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी गेल्या चार महिन्यात बंद काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल झाले असून आता रिक्षा सुरू होऊन देखील रिक्षांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत.

प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार
मालेगाव: शहरात लॉकडाऊन नंतर निर्बंध कमी झाल्याने मालेगाव हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी गेल्या चार महिन्यात बंद काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल झाले असून आता रिक्षा सुरू होऊन देखील रिक्षांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
आता रिक्षासाठी एकतर प्रवासी मिळत नाहीत. मिळाले तर दोन शिवाय जास्त सीट बसवता येत नाहीत. त्यामुळे पेट्रोलचा खर्च भरून निघत नाही. परिनामी व्यवसाय तरी कसा करावा असा प्रश्न रिक्षाचालकांपुढे पडला आहे. प्रवाी मिळाला तरी प्रवाशाला रिक्षाची आणि रिक्षाचालकाला प्रवाशाची भीती वाटते. कारण प्रवासी तर बाधित नाही ना अशी शंका वाटते. याबाबत कॅम्पातील रिक्षाचालक योगेश जोगी यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लॉकडाऊनचे चार महिने अत्यंत हलाखीचे गेले. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पैशांची जमवाजमव करण्यात अडचणी आल्या.