मालेगावी १५ कट्टे रेशनिंगचा तांदूळ जप्त
By Admin | Updated: October 15, 2015 00:03 IST2015-10-15T00:01:31+5:302015-10-15T00:03:03+5:30
मालेगावी १५ कट्टे रेशनिंगचा तांदूळ जप्त

मालेगावी १५ कट्टे रेशनिंगचा तांदूळ जप्त
आझादनगर : मालेगाव येथील रजापुरा भागात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून १५ कट्टे शासकीय तांदूळ जप्त केला. या प्रकरणी मोहंमद गुफरान यास अटक करण्यात आली.
धान्यपुरवठा निरीक्षक आर. एस. तडवी यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या दरम्यान रजापुरा महेबुब मशीदीसमोर पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. यात प्रत्येकी ५० किलोचे १२ कट्टे व ७५ किलोप्रमाणे तीन याप्रमाणे ८२५ किलो शासकीय तांदूळ बाजार भावाप्रमाणे १३ हजार २०० रूपये किंमतीचा माल हस्तगत केला. मोहंमद गुफरान अब्दुल सुभान ५५ रा. घर नं. ३ रजापुरा यास अटक करण्यात आली. मन्सुरी (पूर्ण नाव माहीत नाही) हा फरार आहे.
याबाबत शासकी तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या साठवून ठेवल्याप्रकरणी पवारवाडी पोलिसांत जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पथकात पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस हवालदार विकास खांडेकर, शिपाई गिरीष बागूल,
इमरान सय्यद, हर्षल शिरोळे यांचा पथकात समावेश होता. त्यांना पोलिस हवालदार सुरेश मोरे, गांगुर्डे,
सचिन भामरे यांनी मदत केली. (वार्ताहर)