‘त्या’ दोघा कर्तव्यदक्ष पोलिसांना नांगरे पाटलांकडून २५ हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:04 PM2019-09-24T14:04:11+5:302019-09-24T14:07:42+5:30

सातपूर कॉलनीमधील एटीएम यंत्र कापून रोकड असलेला ‘ट्रे’ लंपास करण्याच्या दरोडेखोरांचा डाव नागरिक व बीट मार्शल शरद झोले, दीपक धोंगडे हे डोळ्यांत तेल टाकत गस्तीवर असल्यामुळे त्यांना एटीएम केंद्रात काही तरी अनुचित घडत असल्याचे लक्षात आले.

A reward of Rs. 25,000 from Nangre Patil for 'those' two duty police | ‘त्या’ दोघा कर्तव्यदक्ष पोलिसांना नांगरे पाटलांकडून २५ हजारांचे बक्षीस

‘त्या’ दोघा कर्तव्यदक्ष पोलिसांना नांगरे पाटलांकडून २५ हजारांचे बक्षीस

Next
ठळक मुद्देबीट मार्शल पोलीसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला चारचाकीचा पाठलाग या दोघा कर्मचाऱ्यांनी शिताफीने सुरू ठेवलातीघे घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत फरार झाले

नाशिक : सातपूर कॉलनी परिसरात मंगळवारी (दि.२४) भल्या पहाटे एटीएमची जबरी लूट रोखत प्रसंगावधान दाखवून दरोडेखोरांच्या जीपचा दुचाकीने पाठलाग सुरू ठेवला. पोलीस नियंत्रण कक्षाला वेळीच सतर्क करत अतिरिक्त मदत मागून दरोडेखोरांना अटकाव करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सातपूर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी शरद झोले, दीपक धोंगडे हे या थरारनाट्यामधील खरे ‘हिरो’ ठरले. त्यांच्या सतर्कतेमुळेच एटीएमची रोकड तर सुरक्षित राहिली; मात्र दोघा दरोडेखोरांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. त्यांच्या चोख कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रत्येकी २५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सातपूर कॉलनी भागातील आयसीआयसीआय बॅँकेचे एटीएम लुटण्याच्या इराद्याने पाच दरोडेखोर बोलेरो जीपने मंगळवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास आले. एटीएम कक्षात प्रवेश करून एटीएम यंत्र कापून चोरट्यांनी थेट उचलून जीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी परिसरातील काही जागरूक नागरिक व गस्तीवरील बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने चोरट्यांनी जीप घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी बीट मार्शलने तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून अतिरिक्त मदतीचा ‘कॉल’ दिला. तत्काळ नियंत्रण कक्षातून सर्व पोलीस ठाण्यांना ‘अ‍ॅलर्ट’ जारी केला गेला अन् भल्या पहाटे दरोडेखोरांच्या जीपचा सिनेस्टाईल पाठलाग नाशिक पोलिसांकडून सुरू झाला. पंचवटीतील हिरावाडी भागात पोलिसांना चोरट्यांना अटकाव करण्यास यश आले. दोघे चोरटे हाती लागले असले तरी त्यांचे अन्य तीघे साथीदार फरार झाले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सातपूर कॉलनीमधील एटीएम यंत्र कापून रोकड असलेला ‘ट्रे’ लंपास करण्याच्या दरोडेखोरांचा डाव नागरिक व बीट मार्शल शरद झोले, दीपक धोंगडे हे डोळ्यांत तेल टाकत गस्तीवर असल्यामुळे त्यांना एटीएम केंद्रात काही तरी अनुचित घडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी दुचाकी उभी करून आत जाण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांना पोलीस आल्याचे समजले. त्यांनी तत्काळ यंत्रातून काढलेला रोकडचा बॉक्स घटनास्थळी फेकून जीपमध्ये बसत पळ काढला. यावेळी बीट मार्शल पोलीसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जीपद्वारे त्यांना अपघाताची हुलकावणी दिली. चारचाकीचा पाठलाग या दोघा कर्मचाऱ्यांनी शिताफीने सुरू ठेवला. एकाने वॉकीटॉक ीवरून ‘कंट्रोल रूम’ला माहिती दिली. रात्रीच्या गस्तीवर असलेले सर्व पोलीस ठाण्यांचे पथक ‘अ‍ॅलर्ट’ झाले. तत्काळ सर्वांनी शोध घेत दरोडेखोरांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी सापळे रचले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील हिरावाडी भागात पोलिसांना दरोडेखारोंवर झडप घालण्यास यश आले. दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; मात्र तीघे घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
 

Web Title: A reward of Rs. 25,000 from Nangre Patil for 'those' two duty police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.