येवला तालुक्यातील मंत्र्यांनी घेतला येवल्यातील जलसंधारण कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:10 IST2017-11-13T00:09:39+5:302017-11-13T00:10:18+5:30

Review of the water conservation work done by ministers from Yeola taluka | येवला तालुक्यातील मंत्र्यांनी घेतला येवल्यातील जलसंधारण कामांचा आढावा

येवला तालुक्यातील मंत्र्यांनी घेतला येवल्यातील जलसंधारण कामांचा आढावा

ठळक मुद्देतालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा आढावा विविध विकासकामांचा पाठपुरावा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

येवला : तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील कातरणी येथे भेट दिली.
तालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा आढावा यावेळी शिंदे यांनी घेतला. शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भविष्यात तालुक्यातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी शिंदे यांनी तालुक्यातील पदाधिकाºयांना दिले. याप्रसंगी शहराध्यक्ष आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक गणेश शिंदे, प्रमोद सस्कर, तालुका सरचिटणीस प्रा. नानासाहेब लहरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोरख खैरनार, शहर उपाध्यक्ष दिनेश परदेशी, सरचिटणीस मिननाथ पवार, गणेश खळेकर, गणेश कायस्थ, युवराज पाटोळे, वीरेंद्र मोहारे, श्रीकांत खंदारे, बंटी धसे, मयूर मेघराज,
विजू श्रीश्रीमाळ, राम शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Review of the water conservation work done by ministers from Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.