सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कामांच्या प्रगतीचा आढावा
By Admin | Updated: November 19, 2014 01:47 IST2014-11-19T01:44:15+5:302014-11-19T01:47:34+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कामांच्या प्रगतीचा आढावा

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कामांच्या प्रगतीचा आढावा
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रेल्वेने येणाऱ्या लाखो भाविकांच्या वाहतुकीचे व त्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने केलेल्या नियोजनाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रेल्वे वगळता अन्य विभाग करीत असलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. मेळा अधिकारी रघुनाथ गावडे व महेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त केल्या जात असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आजवर रेल्वे वगळता अन्य विभागांनी कामात घेतलेल्या प्रगतीपेक्षाही धिम्या गतीने चालणाऱ्या रेल्वेचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला.
कुंभमेळ्यानिमित्त किती भाविक येतील याचा अंदाज बांधत रेल्वेने येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन केलेले असले, तरी पर्वणीच्या काळातील तीन दिवसांत भाविकांची होणाऱ्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण व त्यांना रेल्वे येईपर्यंत थांबून राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात आलेले नाही.
त्याचबरोबर रेल्वेस्थानकावर होणाऱ्या गर्दीचे विभाजन कशा पद्धतीने करणार, चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन मार्ग, बाहेरगावच्या रेल्वे थांबविण्याची व्यवस्था, अतिरिक्त बोग्यांची व्यवस्था यांसह अन्य बारीकसारीक गोष्टींबाबत पुन्हा नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रेल्वेचे नियोजन अभियांत्रिकी, वाणिज्य व कायदा-सुव्यवस्था अशा तिहेरी नियोजनावर चालत असल्याने तिघा विभागांत समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)