जिल्हाधिकाऱ्यांकडून कारागृहाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:28+5:302021-01-08T04:43:28+5:30
कारागृह प्रशासन अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत असून, यापुढेही असेच काम करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी हे कारागृह अभिविक्षक ...

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारागृहाचा आढावा
कारागृह प्रशासन अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत असून, यापुढेही असेच काम करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी हे कारागृह अभिविक्षक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्यातील इतर कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे; मात्र कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नाशिकरोड कारागृहात अद्यापपर्यंत एकही बंदी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळला नसल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी यावेळी दिली. कारागृहात गेल्या वर्षभरात पंधरा बंद्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना प्रशासनाने तत्काळ पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार केल्यामुळे १४ बंद्यांचा जीव वाचला असल्याचे वाघ यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील बैठकीतील इतिवृत्तांताचा आढावा घेतला असता, बहुतांश मुद्द्यांची पूर्तता झाल्याचे नमूद करून उर्वरित मुद्द्यांबाबत पुढील त्रैमासिक बैठकीत चर्चा करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रारंभी कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. (फोटो ०७ जेल)