दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून नॅबच्या उपक्रमांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:36+5:302021-09-26T04:16:36+5:30

नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, युनिट महाराष्ट्र संचालित भावना चांडक फलोर महानॅब स्कूल या अंध मुलींची निवासी ...

Review of NAB's activities by Divyang Welfare Commissioner | दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून नॅबच्या उपक्रमांचा आढावा

दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून नॅबच्या उपक्रमांचा आढावा

नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, युनिट महाराष्ट्र संचालित भावना चांडक

फलोर महानॅब स्कूल या अंध मुलींची निवासी शाळा, कर्णबधिर-अंधत्व,

बहुविकलांग मुला-मुलींची शाळा, स्पेशल बी. एड., डी. एड. महाविद्यालय या

उपक्रमांना दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी

भेट दिली देत कामकाजाची पाहणी केली. अंध मुला-मुलींचे ऑनलाइन शिक्षण पद्धत, ब्रेल लिपी आणि

बहुविकलांग मुला-मुलींचे शिक्षण यासंदर्भात देशमुख यांनी शिक्षकांकडून माहिती

घेतली. तसेच संस्थेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, मंगला कलंत्री यांनी देशमुख यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा उपायुक्त रवींद्र परदेशी, विजय पाटील, कैलास उईके, विनोद जाधव, रत्नाकर गायकवाड, वाल्मीक पाटील, स्मिता सोनी, पूजा भालेराव व कर्मचारी उपस्थित होते.

------- फोटो : आर ला : २५ नॅब --------

मुख्य अंक पान २ साठी -------

Web Title: Review of NAB's activities by Divyang Welfare Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.