संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:50+5:302021-03-04T04:26:50+5:30
--------------------------------------- श्रमदानातून विहिरीचे खोदकाम पेठ : तालुक्यातील दुष्काळग्रस्त घुबडसाका गावाला आपली आपुलकी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलतराव ...

संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
---------------------------------------
श्रमदानातून विहिरीचे खोदकाम
पेठ : तालुक्यातील दुष्काळग्रस्त घुबडसाका गावाला आपली आपुलकी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलतराव कुशारे यांच्या मदतीतून पाईपलाईन करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी चार किलोमीटर अंतरावर श्रमदान करून विहिरीचे खोदकाम सुरू केले आहे. यामुळे लवकरच घुबडसाका गावाचा पाणीप्रश्न मिटेल असा विश्वास नामदेव मोहांडकर यांनी व्यक्त केला आहे.
--------------------------------------------------
लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात
पेठ : तालुक्यातील सर्वच शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण अंतिम टप्यात असून जवळपास १८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली. ज्या कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयात नोंदणी करून लस घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------
शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिम
पेठ : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पेठ तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या २२६ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिम सुरू करण्यात आली असून वाडी, वस्ती सह वीट भट्टी व स्थलांतरीत कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील करून घेण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली.