महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार
By Admin | Updated: August 3, 2014 02:04 IST2014-08-03T02:02:24+5:302014-08-03T02:04:23+5:30
महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार

महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यांत आला. यानिमित्त नाशिक तालुक्यातील भूमीअभिलेखांचे स्कॅनिंग करून त्याचे कायमस्वरूपी अत्याधुनिक पद्धतीने जतन करण्याचा प्रारंभ करण्यात आला.
दि. १ आॅगस्ट २०१३ ते ३१ जुलै२०१४ या महसुली वर्षात शासकीय कामकाज करून विविध उद्दिष्टपूर्ती व जबाबदाऱ्या पार पाडल्याबद्दल नियोजन भवनात जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, नीलेश जाधव, नायब तहसीलदार बाळासाहेब शेवाळे तसेच तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांसह ३० जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, प्रांत आधिकारी बाळासाहेब वाकचौरे, रमेश मिसाळ, सूचिता भामरे, ज्योती देवरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)