रुपये व सोन्याचे दागिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केले़

By Admin | Updated: April 5, 2015 01:10 IST2015-04-05T01:10:01+5:302015-04-05T01:10:31+5:30

रुपये व सोन्याचे दागिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केले़

Revenue and gold ornaments were honestly returned by the hospital staff | रुपये व सोन्याचे दागिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केले़

रुपये व सोन्याचे दागिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केले़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत, माहिती विचारताना येणारा रुग्णांच्या नातेवाइकांना विदारक अनुभव, उर्मटपणाचे बोलणे यामुळे या कर्मचाऱ्यांप्रती सर्वसामान्यांमध्ये नकारात्मकता असली तरी तेथील कर्मचाऱ्यांमधील प्रामाणिकपणा जिवंत आहे़याचे ताजे उदाहरण शुकवारी बघावयास मिळाले़ सीबीएसजवळील अपघातामध्ये मरण पावलेल्या इसमाजवळील हजारो रुपये व सोन्याचे दागिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केले़ सीबीएसच्या सम्राट हॉटेलसमोरील प्रयाग निवासमध्ये राहणारे महेश (शंभूशेठ) गिरीराजप्रसाद अग्रवाल (वय ६२) हे शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून घरी येत होते़ घराजवळीलच गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने त्यांचा अपघात झाला़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना एका रिक्षाचालकाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते़ मयत अग्रवाल यांची सुरुवातीला ओळखही पटलेली नव्हती़ मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यासाठी कक्षसेवक हिरामण मते व शवविच्छेदन कक्षातील कर्मचारी सरजित डींगिया हे आपत्कालीन कक्षात आले़ मृतदेहाची ओळख पटावी यासाठी खिशात काही ओळखपत्र आहे का? याची चाचपणी करीत असताना खिशात ४० हजार ६५१ रुपयांची रोकड, बोटात सोन्याची अंगठी, हातातील घड्याळ, लायसन, पॅन कार्ड आढळून आले़ त्यांनी या सर्व वस्तुंची यादी बनवून पोलीस चौकीतील कर्मचारी पोलीस हवालदार सखाराम शेळके व जाधव यांच्या ताब्यात दिल्या़ यानंतर या सर्व वस्तू अग्रवाल यांच्या वारसांच्या ताब्यात देण्यात आल्या़ जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी हिरामण मते व सरजित डिंगिया, पोलीस कर्मचारी शेळके, जाधव यांच्या या प्रामाणिकतेचे रुग्णालयातील कर्मचारी व नागरिकांनी कौतुक केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Revenue and gold ornaments were honestly returned by the hospital staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.