शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

सेवानिवृत्तांची पेन्शन आॅनलाइन

By admin | Updated: June 8, 2014 00:07 IST

महिन्याच्या पहिल्या दिवशीच सेवानिवृत्तांच्या हाती रक्कम पडणार आहे.

 

नाशिक : सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा पेन्शनची रक्कम आता चालू महिन्यापासून ‘आॅनलाइन’ अदा करण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे बॅँकांवरचा ताण कमी होण्याबरोबरच, महिन्याच्या पहिल्या दिवशीच सेवानिवृत्तांच्या हाती रक्कम पडणार आहे. सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची रक्कम यापूर्वी पेन्शनधारकांचे खाते असलेल्या त्या-त्या बॅँकेच्या शाखेत लेखाकोष विभागाकडून धनादेशाद्वारे अदा केली जात असे. त्यामुळे लेखा खात्याचा धनादेश क्लिअरिंग होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागत असे. दरम्यानच्या काळात जर सुटीचा दिवस आला तर पेन्शनची रक्कम मिळण्यास अधिक विलंब होत असे व साधारणत: १० तारखेनंतरच पेन्शनधारकांच्या बॅँक खात्यात पैसे जमा होत होते. त्यानंतर रक्कम काढण्यासाठी बॅँकेत पेन्शनधारकांची झुंबड उडून त्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता मात्र शासनाने त्यात बदल केला असून, मुंबईच्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून ही सारी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. सेवानिवृत्तांच्या पेन्शनची एकूण रक्कम लेखाकोष विभागाकडून थेट मुंबईच्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाकडे वर्ग करण्यात येऊन तेथून स्टेट बॅँक त्या-त्या पेन्शनधारकांच्या वेगवेगळ्या बॅँका व त्यांच्या शाखांमध्ये पेन्शनची रक्कम जमा करेल, जेणेकरून त्याच दिवशी ही रक्कम पेन्शनधारकांच्या नावे जमा होईल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र बॅँक, देना बॅँक, स्टेट बॅँक अशा राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्येच पेन्शन खाते आहे. पूर्वी प्रत्येक बॅँकेत पेन्शनची रक्कम वर्ग करावी लागत असे. आता फक्त एकमेव स्टेट बॅँकेमार्फतच या साऱ्या बॅँकांकडे पेन्शनची रक्कम देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण तीस हजारांहून अधिक पेन्शनधारक असून, जवळपास एक डझनहून अधिक बॅँका व त्यांच्या पुष्कळशा शाखा आहेत. परंतु नवीन प्रणालीमुळे आता ही प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. (प्रतिनिधी)