सेवानिवृत्तांचे पेन्शन हलविले; जिल्हा परिषदेचा निर्णय

By Admin | Updated: April 18, 2017 00:58 IST2017-04-18T00:58:02+5:302017-04-18T00:58:22+5:30

जिल्हा बॅँकेला दणका : पाच कोटींची रक्कम

Retired pension pensions; Zilla Parishad's decision | सेवानिवृत्तांचे पेन्शन हलविले; जिल्हा परिषदेचा निर्णय

सेवानिवृत्तांचे पेन्शन हलविले; जिल्हा परिषदेचा निर्णय

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसह खासगी क्षेत्रातील शिक्षकांचेही एकीकडे वेतन रखडलेले असतानाच, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने जिल्ह्यातील सुमारे दहा हजार सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत न टाकता अन्य बॅँकेत टाकल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ही रक्कम सुमारे पाच कोटींच्या घरात असल्याचे समजते.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची जिल्हा परिषदेत भेट घेऊन त्यांना सेवनिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन जिल्हा बॅँकेकडून वेळेवर होत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना याबाबत सूचना देत सेवानिवृत्तांचे तत्काळ वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. तिकडे जिल्हा बॅँकेच्या शिक्षकांनीही वेतन वेळेवर होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे तक्रारी करीत जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेत जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. (प्रतिनिधी)जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन किमान सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन वेळेवर होण्यासाठी या महिन्याचे जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे दहा हजार सेवानिवृत्तांचे वेतन जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने जिल्हा बॅँकेत न भरता ती अन्यत्र राष्ट्रीयीकृत बॅँकेत भरल्याचे समजते. त्यामुळे पुढील मे महिन्यातील सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन त्यांना वेळेवर मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेला त्यांच्या आर्थिक कोंडीला कंटाळून हा पहिला दणका दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

Web Title: Retired pension pensions; Zilla Parishad's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.