किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत
By Admin | Updated: July 15, 2016 23:09 IST2016-07-15T23:02:46+5:302016-07-15T23:09:32+5:30
किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत
येवला : भाजीपाला लिलाव सुरूयेवला : भाजीपाला अडत व्यापाऱ्यांनी शुक्र वारी सकाळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून कोणतीही अडत न आकारता किरकोळ खरेदीदार व्यापाऱ्यांकडून आठ टक्के अडत आकारली आणि बाजार समितीला एक टक्का शुल्क देण्याचे धोरण ठरवून शुक्रवारीपासून मार्केटमध्ये लिलाव सुरू झाले.
येवला बाजार आवारात भाजीपाल्याचे लिलाव गुरुवारपासून (दि. ७) बंद होते. शुक्र वारी सकाळी तब्बल सात दिवसांनी लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. किरकोळ खरेदीदारांच्या मनात अजूनही संभ्रम अवस्था आहे. बाजार समिती नियमन मुक्तीविरोधात व्यापारी व अडतदार यांनी भाजीपाल्यासह कांदा लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भावदेखील कमालीचे वाढले आहेत. आषाढी एकादशीला बाजारात भाजीपाला कमी असल्याने बाजारभावदेखील चढे होते. बटाटे ५० रुपये किलोने विकले गेले.
शेतकरी झाले व्यापारी
येवला बाजार समिती भाजीपाला नियमन मुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात लिलाव बंद ठेवले असले तरी दररोज तालुक्यातील सुमारे २०० शेतकऱ्यांनी स्वत:हून भाजी मार्केटमध्ये थेट ग्राहकांना भाजीपाला विकला आहे. येवला मार्केटमध्ये आठ परवानाधारक भाजीपाला आडते आहेत, तर सुमारे २०० किरकोळ खरेदीदार व्यापारी आहेत. भाजीपाला तेजी जून आणि जुलै महिन्यात असते. इतर दहा महिने भाजीपाला मंदीच्या सावटाखालीच असतो. तेजीत शेतकरी आनंदी राहील मात्र मंदीच्या वेळी शेतकऱ्याच्या व्यथेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.(वार्ताहर)