‘त्या’ उमेदवारांची झाली फे रचाचणी
By Admin | Updated: June 22, 2014 00:33 IST2014-06-22T00:10:11+5:302014-06-22T00:33:25+5:30
‘त्या’ उमेदवारांची झाली फे रचाचणी

‘त्या’ उमेदवारांची झाली फे रचाचणी
नाशिक : शहर पोलीस भरतीतील पहिल्या दिवसाच्या भरतीतील सदोष ट्रॅकचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी या उमेदवारांची फेरचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता़ या निर्णयानुसार शनिवारी ३२३ उमेदवारांची फेरचाचणी घेण्यात आली़ उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू असून, रविवारी लेखी परीक्षेची तारीख व ठिकाण निश्चित केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़
शहर पोलीस आयुक्तालयात ४७१ पोलीस शिपाई पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली़ या भरतीच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांची धावण्याची चाचणी घेताना १०० मीटरऐवजी ८० मीटर अंतराचाच ट्रॅक असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले़ तसेच ही बाब भरतीप्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही ट्रॅकचे अंतर मोजले असता यामध्ये चार-पाच पावलांचा फरक आढळून आला़त्यामुळे पोलीस आयुक्तांनी भरतीच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या उमेदवारांची शनिवार (दि़२१) रोजी धावण्याची फेरचाचणी घेण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार आज ३२३ उमेदवारांची फे रचाचणी घेण्यात आली़ लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी खऱ्या अर्थाने पारदर्शी झाल्याची भावना भरतीप्रक्रियेतील काही उमेदवारांनी व्यक्त केली़ दरम्यान, या भरतीप्रक्रि येत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू असून, लेखी परीक्षेसाठी जागा व तारीख ठरविण्याचे काम सुरू असून, त्याबाबत रविवारी माहिती दिली जाणार आहे़ (प्रतिनिधी)