दहावीचा निकाल आज
By Admin | Updated: June 13, 2017 00:53 IST2017-06-13T00:53:17+5:302017-06-13T00:53:33+5:30
दहावीचा निकाल आज

दहावीचा निकाल आज
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल उद्या (१३ जून) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
गुणपडताळणीसाठी १४ ते २३ जूनपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रतींसाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये घेतली जाणार आहे, त्यासाठी १९ जूनपासून अर्ज भरावी लागतील.
उशिरा का लागला?
राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला.
राज्य मंडळाला ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने निकाल लावण्यास विलंब लागला.