कळवण तालुक्याचा निकाल ९२.३८ टक्के

By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-06T23:43:30+5:302016-06-07T07:32:02+5:30

भक्ती निकुंभ कळवण केंद्रात प्रथम : आरकेएमचा निकाल ८५.६७ टक्के

The result of Kalwan taluka is 9 2.38 percent | कळवण तालुक्याचा निकाल ९२.३८ टक्के

कळवण तालुक्याचा निकाल ९२.३८ टक्के

कळवण : मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत (दहावी) कळवणच्या आरकेएम माध्यमिक विद्यालयाची भक्ती निकुंभ हिने ९५ टक्के गुण मिळवून कळवण केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला असून, कळवण तालुक्याचा निकाल शेकडा ९२.३८ टक्के लागला आहे, तर कळवणच्या आरकेएम माध्यमिक विद्यालयाचा ८६.६७ टक्के निकाल लागला.
कळवण तालुक्यातून दोन हजार ७४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ५५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९२.३८ टक्के लागला असून, शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला.
आरकेएम माध्यमिक विद्यालयातील ३७७ पैकी ३२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा ८५.६७ टक्के निकाल लागला. शाळेतील भक्ती निकुंभ ९५ टक्के गुण मिळवून कळवण केंद्रात प्रथम आली, तर विद्यालयातील अदिती कोठावदे (९२ .२० टक्के) गुण मिळवून द्वितीय , तर राहुल बाळू सोनवणे ९१.२० टक्के गुण मिळवून तृतीय आला असल्याची माहिती प्राचार्य एन. पी. पवार यांनी दिली.
कळवण तालुक्यातील मानूर येथील जनता विद्यालय (८६.३१ टक्के), माध्यमिक आश्रमशाळा (१०० टक्के) निकाल लागला. यशवंतराव चव्हाण विद्यालय निवाने (८८.७३ टक्के), माध्यमिक विद्यालय
ओतूर (९८.७२), शासकीय आश्रमशाळा नरूळ (९८.७३), श्रीराम विद्यालय (९६.८८) व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कनाशी (१००), जनता विद्यालय, पाळे (८१.४३), जनता विद्यालय, चिंचपाडा (१००), शासकीय आश्रमशाळा, खिराड (१००), शासकीय आश्रमशाळा, दळवट (९७.३०), कै. गिरजाबाई सोनूजी अहेर माध्यमिक विद्यालय, दळवट (९६.६२), जनता विद्यालय, अभोणा (९२.७८) टक्के निकाल लागला. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मोहनदरी (९६.४३ टक्के), परमपूज्य ओमदत्त ठाकूर माध्यमिक विद्यालय, सप्तशृंगगड
(७६.४७), शासकीय आश्रमशाळा, चणकापूर (९८.५९), जनता विद्यालय, काठरे दिगर (९७.७८), माध्यमिक आश्रमशाळा, सुळे (९७.४४), महात्मा फुले हायस्कूल, मोकभणगी (९४.७४), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गणोरे (९८.३९), जनता विद्यालय, रवळजी (७९.१७), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर (१०० टक्के), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, काठरे ( ९२.८७ ), जनता विद्यालय, पिळकोस (९६.४३), माध्यमिक विद्यालय सुकापूर (९४.२३), डी. एन. देशमुख
माध्यमिक आश्रमशाळा, आठंबे
(१०० टक्के) निकाल लागला.
जानकाई माध्यमिक विद्यालय कळवण ( ९०.९१ टक्के), माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळे बु।। (९७.२२), न्यू इंग्लिश स्कूल, विसापूर (७२.३४) , महात्मा फुले हायस्कूल, बेज
(९५.२४), कै. दगा रामभाऊ हिरे माध्यमिक विद्यालय, देसराणे (८७.५०), शासकीय आश्रमशाळा, बापखेडा (९८.२५), व्ही. टी. अहेर माध्यमिक विद्यालय, देसगाव
(१०० टक्के), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर (१००टक्के), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, काठरे (९२.८६), माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळे बु।। (९७.२२), बायजाई माध्यमिक विद्यालय, पाडगण, पिंपळे खुर्द (८० टक्के), जनता विद्यालय, देसगाव (८४.३८), सप्तशृंगी माध्यमिक विद्यालय, नाळीद (८० टक्के), माध्यमिक
विद्यालय, कळवण (६४.७१), चिंतामण गावित माध्यमिक विद्यालय, ओझर (९३.१०), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खर्डे दिगर (९७.५६), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गोपाळखडी (९७.९६), माध्यमिक विद्यालय, अभोणा (१००टक्के) निकाल लागला आहे.

Web Title: The result of Kalwan taluka is 9 2.38 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.